"श्री"ना अभिप्रेत असलेला धर्म
ध्रीयते अनेन इति धर्म: | ज्यांच्या वाचून जो राहू शकत नाही, तो त्यांचा धर्म: ज्याच्या योगे जगाचे धारण-पोषण होते, म्हणजेच आत्मा
धर्माधार्माचे टवाळ | जे का डावी अज्ञानमुळ | जे त्यजुनी त्यजि सकाळ धर्मजात | आणि माझ्याकडे (आत्म्यामध्ये) स्थिर राहा.
सस्तंग आणि अहर्निशी
परमार्थ – श्रेष्ठ अर्थ ज्याचा कधीही नाश होत नाही. चोवीस तास कसा करायचा १ प्रत्येक क्रिया आत्म्यासाठीच होत आहे हा निश्चय करायचा, त्याच्यासाठी सत्संग. सतत आहे त्याचा संग. सतत कोण आहे १ आत्मा | सत्संग सर्वात श्रेष्ठ | देव सतत आहे. त्याला ओळखणारे संत. त्यांना शरण गेल्याने ते कळते.
संतसभा – अनंत सुखाला लायक व्हावे. तुमच्याजवळ जे आहे ते, तुम्हाला ते अर्पण करतात.
तुम्हीच राजे आहात, पूर्ण आहात. राजाचे वैभव भोगण्यासाठी गुरुवर विश्वास ठेवा. आणखीन हजारो जन्म जरी घेतले तरी मी संतसंगच मागणार. त्या चैतन्याला अनेक नावे. सर्व खलु इंद्रम ब्रम्ह | असा निश्चय होण्यासाठी संतसंग | मला जन्म नाही, मृत्यु नाही असा माझा निश्चय राहो.
जत्रा – संतसंगात जा आणि तरा. तरलो असे वाटले पाहिजे. मी आत्मा असे म्हणा म्हणजे जग जिंकलेत |
आहे तरी परम सुगम | परी जनासी जाहला दुर्गम | का तयाचे चुकले वर्म | सत्संगामाकडे || सुगम म्हणजे काही न करणे. कर आहे तेथे दर आहे, केले म्हटले की बंधन |
नरदेह :
इहलोकीचा हा देह | देव ईश्चीताती पाही | स्वर्गीचे देव नरदेहाची इच्छा करतात. कारण देवांना स्वातंत्र्य नाही. मुक्त होण्याचे स्वातंत्र्य नरदेहातच आहे. देवापेक्षा मानव देह श्रेष्ठ |
पौर्णिमेची वारी – सप्तहा : सन १९९३ च्या गुरुपौर्णिमेपासून पौर्णिमेच्या वारीस सुरुवात झाली. या वारीच्या आणि सप्त्याच्या संदर्भात “श्री” म्हणतात – वारी वारी जन्म मरणाते वारी | (जन्म नाही मृत्यु नाही) यासाठी पौर्णिमेची वारी | कुणी मेले तरी येथे यायला पाहीजे. जो येणार नाही त्याचे तोंड बघू नये.
संतसंगात तुम्ही रमावे या उद्देशाने सप्ते | ते चुकवू नका. तुमचा अध:पात होऊ नये. सप्त्यांचा मोह तुम्हाला व्हावा ही बुद्धी महाराजांनी तुम्हाला द्यावी.
सोन्याचा मुलगा सोनेच. तुम्ही पण तसे व्हा. ते अमृत प्यायला शिका. खरे कल्याण गुरु करतात. म्हणून वारीसाठी घर सोडा. त्याने घरघर थांबते. नवऱ्याला (बायकोला) सोडू नका त्यालाही इथे आणून संसार करायला शिका.
संसार :
आधी प्रपंच करावा नेटका – नीट विचार करून. मुर्खाने संसार करू नये. ज्ञानाने संसार करावा. संसार केव्हाही अपूर्णच. ज्या देवाकडे तुम्ही संसार पूर्ण करण्यासाठी जाता त्याचा संसारही अपूर्णच राहिलाय.
संसार पाठीमागे लावलाय तो फजिती होण्यासाठी, त्यानंतर त्याहून बाहेर येण्यासाठी – तशी तीव्र इच्छा होण्यासाठी.
संसार सोडायचा नाही, ही शिक्षा भोगूनच संपवायची | माझे गुढगे दुखतात, ताप आलाय – माझ्या डोक्यावर हात ठेवा, मंत्रून तीर्थ दया, हे बरोबर नाही. भोग भोगायला लागणारच, त्यापासून अलिप्त राहण्याचा अभ्यास ठेवा. प्रत्येक जण रडणार. ज्यास्तीत ज्यास्त बोंबाबोंब व्हावी असा मी आशीर्वाद देणार.
नवऱ्याला नवरा म्हणा, बायकोला बायको म्हणा, मुले होऊ दया, पण सोंगाडे आहात हे विसरू नका. जन्म तेथे दुख:, देह तिथे बोंबाबोंबी, यातून मुक्त होण्यासाठी संताला शरण जाणे.
नित्य नियमावली :
साधन-शिष्यांच्या पारमार्थिक विकासासाठी सहाय्यभूत होईल अशा पद्ध्तीची नित्यानियमावली करण्यांत आलेली आहे. त्या संत तुकारामांच्या बारा अभंगाचा समावेश आहे ज्यांना स्वत: पंढरीच्या पांडुरंगाने वरदायक आशीर्वाद दिलेला आहे. शिवाय इतर संतांची अर्थपूर्ण कवने, अभंग त्यात आहेत. पाहते काकड आरती, सकाळी सकाळचे भजन, दासबोध, मनाचे श्लोक वाचन – श्रवण, रात्री भजन-आरती, शेजारती, पाळणे असा परिपाठ आहे. अनुग्रह घेतलेल्या प्रत्येक शिष्याने हे सारे नित्यनेमाने करणे अत्यंत आवश्यक आहे. असे गुरु भजन केल्यानंतर, “जाणतेन गुरु भजिजे | तेणे कृतकार्य होईजे | जैसे मुळ सिंचने सहजे | शाखापल्लव संतोषति |” या ज्ञानाबांच्या ओवीची अनुभूती यायला लागते, ती ज्याची त्याने घ्यायची आहे. या संप्रदायात चमत्कार तसेच सिद्धींना प्राधान्य नाही. सिद्धी म्हणजेच विषयासक्ती | इथे प्राधान्य आहे ज्ञान, विज्ञान योगाला. कारण ज्ञाननिष्ठा अर्धक्षण | ते तपदि नाना साधने | पावणे नाही कल्पांति | श्रवणभक्ती बद्दल “श्री” म्हणतात – भजन दररोज करा. श्रवणानेच भ्रम झालाय तो श्रवणानेच नाहीसा होतो, रिता नाही ठाव ब्रम्हाविण ओस स्थळ नाही | गुप्त आहे उदंड धन | ते समजण्यासाठी श्रवण. सांप्रदायिक नियम पाळायला पाहिजेत. नुसते आत्मा, आत्मा म्हणून चालायचे नाही. संसारी लोक लग्नानंतर नियम पाळतात की नाही १ तेव्हाच ज्ञानपुत्र जन्म घेतो.
Accolades
Et ligula sit quam, sapien lorem. Nec risus lorem vestibulum mi facilisis. Tincidunt urna accumsan nec risus lorem vestibulum mi facilisis.