"श्री"चे शिष्यावरील प्रेम
मला जे आई म्हणतात, ते मरणारच नाही. माझ जे ऐकतात ती माझी मुले.
तुम्ही आलात कि मला आनंद होतो. माझा आनंद कसा राहील, हे तुम्ही ठरवायचं. सर्व ठिकाणी मीच (आत्मा) आहे ते विसरू नका. मला तुम्ही विसरू नका आणि मी तुम्हाला विसरणार नाही.
मुलाला आईच सांगू शकते. तसे मला वाटते, म्हणून पुन्हा पुन्हा सांगावे लागते. ते माझा कर्तव्य आहे.
“श्री गुरु प्रसन्न होये | शिष्य विद्या हि कीर लाहे |
परि ते फळे सांप्रदाये उपासिलिया | ते ज्ञान फळे येण्यासाठी सदगुरू भजन ||”
माझे मुले कशी सांभाळायची ती जबाबदारी माझी. मी कुणाचे ऐकणार नाही. माझी मुले शहाणी आहेत. मुलांना सोडून जाता येत नाही आईला.
परमेश्वराला मी जिंकून घेतलंय. लहान मुलांचे कल्याण कसे होईल हि चिंता, संतांना
निर्माण करण्यासाठी आम्ही जन्म घेतलाय. तुम्ही गुरुवर विश्वास ठेवा व श्रीमंत व्हा. आमचे डबोले (ज्ञान) मिळवा, हा आशीर्वाद !
सदगुरू आणि सदगुरूकृपा :
जो शोधील आपणासी | सदगुरू कृपा कळेल त्यासी | आत्म्यावर विश्वास ठेवायला सांगतो तो सदगुरू. सद्वस्तु दाखवी तो सदगुरू | सिद्ध वस्तूला काढून दाखविणारा काडसिद्धेश्वर |
गुरु सांगतात तसे करा आणि पहा म्हणजे गुरुकृपा : ती आहेत : पण आत्मकृपा सर्वात श्रेष्ठ | तुम्ही तसे म्हटले नाही तर (“मी आत्मा आहे”असे) काय करायचे एक ती कृपा होण्यासाठी गुरुवर श्रद्धा पाहिजे. विश्वासिता नीरूपणी मुक्ती लाभे तत्शणी |
तुम्ही मुक्तच आहात हा विश्वास ठेवा.