"श्रीं"चा आत्मनिश्चय
१९९८ ची गुरुपौर्णिमा “श्री”ना मुंबईस हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. अत्यंत गंभीर परिस्थिती होती. डॉक्टरांनी संपूर्ण विश्रांती सांगितली. “श्री” म्हणाले, मी तुमचा पेशंट आहे, परंतु माझे पेशंट माझी वाट पाहत आसतील. कुणाचेही न एकता “श्री” नी अम्ब्यूलंस आणायला लावली. डॉक्टर व नर्स सोबत घेऊन पुण्याला आले. त्यांना व्हील चेअरवर बसवून स्टेजवर आणले. शिष्यांच्या डोळ्यांत सद्गुरू माउलींच्या दर्शनाने आनंदाश्रू तरळले. तेथे “श्री” नी अर्धा तास प्रवचन केले. “वाट्टेल ते झाले तरी सप्तहा चुकवू नका” धन्य ती गुरुभक्ती आणि धन्य ते शिष्यप्रेम.
जग सुंदर आहे. भव्य-दिव्य आहे. मायेच्या कुंचल्यातून सप्तरंगाची पाखरण घातलेली आहे. सृष्टी सती भरजरी शालू नेसून, अनंत रंगानी नटलेली आहे. भगवंताच्या या लीलेबद्दल आम्ही तृप्त आहोत. ते सारे ब्रम्हच आहे. सोने बनले लेणे नेसोनी लेश उणे | अलंकार इतके सुंदर, तो परमात्मा केवढा सुंदर असेल | त्या भुवन मनोहर परमात्म्याला आम्ही शरण आहोत. आम्ही लेकुरेच आहोत त्यांची. काडसिद्धेश्वर माउलीचा ब्रम्हरस आम्ही प्राशन केलेला आहे. या लीलेत आम्हाला जी भूमिका मिळालेली आहे ती “श्रीं”च्या सत्संगात आत्मदृष्टी ठेवून अनुभवीत आहोत. स्वत:ला अटक करून न घेता नाटक कसे करायचे हेच “श्रीं”नी आम्हाला शिकविले आहे कारण आहे ते सारे पूर्ण आहे. गुरुपौर्णिमा देखील पूर्णत्वाने नटलेली आहे. या स्वरूप सांप्रदायाचा प्रत्येक शिष्य पूर्णच आहे. या पूर्णत्वाची प्रकाशक आहेत सद्गुरू काडसिद्धेश्वर माउली |